एक्स्प्लोर

'शेर कितना भी भूखा हो घास नहीं खाता', मुख्यमंत्रीपदाबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच भाजपसोबत महायुतीत मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर आमच्याकडे अन्य पर्याय आहेत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या आघाडीसोबत जाण्याच्या शक्यता फेटाळल्या.

  मुंबई : राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बसणार, असं भाजप नेते निवडणुकीपूर्वी म्हणायचे. परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपने त्यांचा पवित्रा बदलला असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार, असं वक्तव्य वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. शिवसेनादेखील आता मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच भाजपसोबत महायुतीत मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर आमच्याकडे अन्य पर्याय आहेत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शेर कितना भी भूखा हो, लेकीन वो घास नहीं खाता. असे बोलत मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार नाहीत, असे सूचवले आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे. परंतु त्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही निवडणूक महायुतीत एकत्र लढलो, त्यामुळे दुसरा पर्याय कसा असू शकतो? ज्यांचं बोधचिन्ह वाघ आहे, ते काँग्रेसच्या हाताशी हातमिळवणी कशी करतील? जो कोणी मुख्यमंत्री असेल, तो पाच वर्षांसाठी महायुतीचाच असेल. तो कोणत्याही पक्षाचा नव्हे तर महायुतीचा असेल. नोव्हेंबरमध्ये त्याचा शपथविधी होईल. युतीच्या संबंधांवर सुधीर मुनगंटीवार यांनी गाण्यातून मार्मिक भावना व्यक्त केली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, "तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना, मैंने नही जाना, तूने नही जाना" युतीचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी, परंतु काळजीचं कारण नाही. अनेक आव्हानात्मक प्रसंग आतापर्यंत आले. परंतु आमचं गोत्र एक आहे. 'भारतमाता' हे आमचं गोत्र आहे. उद्धवजी एक सह्रदयी नेते आहेत, आम्ही आणि ते मिळून सर्व काही मार्गी लावू. मुख्यमंत्रीपदाबाबतचे प्रश्न चर्चेतून सुटतील. त्यासाठी स्वतः भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्धवजींशी चर्चा करतील. उद्धवजींनी मागणी समोर ठेवली आहे. प्रस्ताव तर द्यावाच लागतो. तो त्यांनी दिला आहे. पाहा काय म्हणाले मुनगंटीवार?

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget