एक्स्प्लोर

Chinchwad Bypoll Election : पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार; पक्षश्रेष्ठींसमोर प्रस्ताव मांडणार

Chinchwad Bypoll Election : चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमुखाने निर्णय घेतला आहे.

Chinchwad Bypoll Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad bypoll election) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भाजपचा कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक लढायची, असं स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवल्याची माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिडवणूक होत आहे. येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी रिंगणात उतरणार की निवडणूक बिनविरोध होणार? याच्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीने निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नाना काटे (Nana Kate), भाऊसाहेब भोईर (Bhausahen Bhoir) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे (rahul Kalate) यांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय

लक्ष्मण जगताप हे भाजपात येण्यापूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यांचे आणि अजित पवारांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी ही निवडणूक बिनविरोध होऊ देईल, असं बोललं जात होतं. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना किंवा त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली तर बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर सगळे पक्ष एकवटू शकतात अशाची चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. 

शंकर जगताप रिंगणात उरणार का?

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी शंकर जगताप यांचा भावी आमदार म्हणून फोटो टाकण्यास सुरुवात केल्याने व्हॉट्सअॅप स्टेटस आणि रील्सही करण्यात आल्या. हे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे एकेकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. प्रस्ताव मांडल्यावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget