नवी दिल्ली : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेचा सस्पेंस अखेर संपला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचं स्पष्ट झालं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबतच्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

आपण एकत्र आहोत याचा संदेश देण्यासाठी राष्ट्रवादीला जागा सोडण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतला. राहुल गांधी यांचा निर्णय मान्य आहे. आता जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, पालघरमध्येही लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा काँग्रेस लढणार आहे.

भंडारा गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार : प्रफुल्ल पटेल

भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं.

इतकंच नाही तर खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे लहान भाऊ आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघरची पोटनिवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या :

आगामी सर्व निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र : प्रफुल्ल पटेल


भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार: प्रफुल्ल पटेल  

प्रफुल्ल पटेल भावासारखे, भंडारा-गोंदियात एकमेकांना मदत करु : पटोले  

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक कोण लढवणार?  

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा  

मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने वकिलाला फोनवरुन धमकावलं : पटोले  

भाजपचे माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार  

माजी खासदार नाना पटोलेंची घरवापसी, काँग्रेसमध्ये प्रवेश  

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले