नवी दिल्ली : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडायची की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील, असं काँग्रेसच्या नाना पटोलेंनी म्हटलं आहे.


एकीकडे ही जागा आपणच लढवणार असल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं आह, तर काँग्रेसनेही या जागेवरचा आपला दावा कायम ठेवला आहे. नाना पटोले राहुल गांधींची भेट घेणार आहेत. त्यानंतर ही जागा नेमकी कोण लढवणार, याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, निवडणूक कुणीही लढवली तरी भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र लढू, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

भंडारा गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार : प्रफुल्ल पटेल

भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं.

इतकंच नाही तर खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे लहान भाऊ आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघरची पोटनिवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या :

आगामी सर्व निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र : प्रफुल्ल पटेल


भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार: प्रफुल्ल पटेल  

प्रफुल्ल पटेल भावासारखे, भंडारा-गोंदियात एकमेकांना मदत करु : पटोले  

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक कोण लढवणार?  

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा  

मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने वकिलाला फोनवरुन धमकावलं : पटोले  

भाजपचे माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार  

माजी खासदार नाना पटोलेंची घरवापसी, काँग्रेसमध्ये प्रवेश  

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले