मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) तुतारीवाला माणूस (Tutarivala Manus) हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केलं आहे. 


 






काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे.  वटवृक्ष हे चिन्ह शरद पवार गटाने मागितल्याची माहिती होती. पण निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिलं.


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात


या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. 


तात्पुरतं मिळालेलं नाव आणि चिन्हही कायम राहण्याची शक्यता


सार शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे (Adv. Siddharth Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 


राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आज केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) असं नवीन नाव निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलं आहे. तसेच त्यांना चिन्ह म्हणून 'तुतारीवाला माणूस' दिलं आहे. 


ही बातमी वाचा :