Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. तीन दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याही बैठका होत आहेत. आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, असं शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना सूचना दिल्याचं समजतेय. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी संघर्षाची तयारी ठेवा, असं सांगितलेय. 


सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना केलीय. आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर काल झालेल्या बैठकीची माहितीही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडायला हवं, असं मत शरद पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांना अपयश आलं. त्यावरुन पवारांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतेय.


एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शरद पवार यांनी गृहखात्यावर नाराज व्यक्त केली आहे. इंटेलिजन्सच्या अपयशामुळे शरद पवार गृहखात्यावर नाराज असल्याचं समजतेय. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही? असा सवालही शरद पवार यांनी बुधावारी झालेल्या बैठकीत उपस्थित केला.  गृहमंत्री आणि जयंत पाटलांसोबत बैठकीत पवारांनी नाराजी व्यक्त केली.  दरम्यान, पोलिसांचं संरक्षण असणाऱ्या मंत्री अथवा राजकीय नेत्याला एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जायचं असल्यास त्यांच्यासोबत असणाऱ्या विशेष सुरक्षा दलामधील व्यक्तींनी यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक असतं. मग मंत्री आणि आमदारांनी बंडखोरी केली, पण गृहखात्याला काहीचं समजलं नाही का? असा सवाल उपस्थित होतो. 


संबंधित बातम्या: