Maharashtra Politics Crisis astrology : एकीकडे राज्यात उलथापालथ सुरू असताना आता नाशिकमधील अनिकेत शास्त्री जोशी राज्यात सत्ता बदल होण्याचे संकेत दिले आहे. जोतिष शास्त्रानुसार राज्यात सत्ता बद्दल होण्याची शक्यता अनिकेत शास्त्री जोशी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिंदेचे बंड पुराण चांगलेच गाजत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला बुचकळ्यात पाडले आहे. त्यामुळे काल जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे गटाला माझ्यासमोर येऊन राजीनामा मागण्याचे आव्हान केले. आता नाशिक येथील अनिकेत शास्त्री यांनी राज्यात सत्ता बदल संदर्भात एक भाकीत केले आहे.

 

अनिकेत शास्त्री म्हणाले की, जोतिष शास्त्रानुसार राज्यात सत्ता बद्दल होण्याची शक्यता आहे. तर शनी, मंगळ, राहू, केतू ग्रहांच्या दुष्प्रभावाचा काही राजकीय पक्षांना मोठा फटका बसणार असल्याचा दावा ज्योतिषाचार्य महंत स्वामी अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे.

 

तसेच पुढच्या काही दिवसात पक्ष फुटणे, सरकार बरखास्त होणे अशा घटना शक्य असून राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्फोटक वातावरण तयार होणार आहे. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत असून येणाऱ्या महिन्यात नैसर्गिक आपत्तीची देखील शक्यता असल्याचा दावा ज्योतिष अभ्यासक स्वामी अनिकेतशास्त्रींनी केला आहे.


 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार, व्हिडिओ समोर 


शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाने दुपारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत, शिवसेनेचे 35 आमदार दिसत असून 7  अपक्ष आमदार असल्याचे दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र 


Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?


राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना