Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार गटाकडून चार चिन्हं निश्चित, एकाची निवड होणार; सूत्रांची माहिती

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष हातातून गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं चिन्ह आण नाव निवडणूक आयोगाला सूचवायचं आहे. 

Continues below advertisement

मुंबई: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने लागल्यानंतर आता शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे. 

Continues below advertisement

केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय. 

चार चिन्हांची निवड, एकाची निवड होणार

शरद पवार गटाकडून त्यांच्या नव्या पक्षासाठी चार चिन्हांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड ही करण्यात येणार आहे. 

अजित पवारांसोबत किती आमदार? 

- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7 आमदार 
- झारखंड 1 आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5 
- राज्यसभा 1 

शरद पवारांसोबत किती आमदार? 

महाराष्ट्रातील आमदार 15 
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3

शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा

शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचा व्हिप मानायचा का नाही हा शरद पवार गटासमोर प्रश्न असणार आहे. 

 

ही बातमी वाचा: 

 

 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola