First Indian in Space | शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल | भारताचा ऐतिहासिक क्षण
भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं यान भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल झालं. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात जाणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. पुढचे दोन आठवडे ते अनेक वैज्ञानिक बाबींचा अभ्यास करतील आणि निरीक्षणं नोंदवतील. अंतराळात पोहोचताच शुभांशु शुक्ला यांनी भारतीयांसाठी खास संदेश पाठवला.