एक्स्प्लोर

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात, सीजे हाऊस प्रकरणाची चौकशी

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरुन प्रफुल्ल पटेल यांची चौकशी झाली होती

मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आज ईडी कार्यालयात वरळी येथील सीजे हाऊस येथील फ्लॅट खरेदी प्रकरणात सही करण्यासाठी आले होते. याबाबतची माहिती स्वतः प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.यापूर्वी ईडीकडून या प्रकरणी दोनदा प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात आलं होतं. एकदा प्रफुल पटेल चौकशीसाठी देखील आले होते. सीजे हाऊस येथील एक फ्लॅट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार इकबाल मिर्ची याच्याकडून खरेदी केल्याचा आरोप प्रफुल पटेल यांच्यावर आहे. ईडीने या आधी इकबाल मिर्ची याची काही प्रॉपर्टी देखील सील केली आहे. मनी लॉंड्रीग प्रकरणी आत्तापर्यंत इकबाल मिर्ची याची ईडीने बरीच प्रॉपर्टी सील केली आहे

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरुन चौकशी झाली होती. प्रफुल्ल पटेल यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. असिफ मेमनच्या अकाऊंटवरुन काही कोटींची ट्रान्झॅक्शन्स पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झाल्याचा संशय आहे.  इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि मुलगा असिफ आणि जुनैदच्या यांच्या नावे सीजे हाऊस इमारतीत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या बदल्यात असिफनं पैसे मिलेनियम डेव्हलपर्सला दिल्याचा संशय आहे. 

 सीजे हाऊस ही वरळीतली हायप्रोफाईल सोसायटी आहे.. जी पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित केल्याची ईडीची माहिती आहे.  ईडी चौकशीनंतरही इक्बाल मिर्चीसोबत मिलेनियमनं कुठलेही आर्थिक व्यवहार केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलं होतं. मिर्ची कुटुंबाला सीजे हाऊसमध्ये दिलेली प्रॉपर्टी ही भाडेकरु कायद्याच्या अंतर्गत असलेल्या अधिकारांमुळे दिल्याचा पटेल यांचा दावा आहे. 

सीजे हाऊसच्या जागी एम.के.मोहम्मद हे भाडेकरु होते.  ते हॉटेल चालवायचे ज्याचे अधिकार इक्बाल मिर्चीच्या कुटुंबानं विकत घेतले होते असा पटेल यांनी दाला केला होता. तर 1990 मध्ये इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन यांनी एम.के.मोहम्मद यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा आहे. 
2007 मध्ये ही प्रॉपर्टी हजरा मेमन, असिफ आणि जुनैदच्या नावे रजिस्टर करण्यात आल्याचीही माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget