एक्स्प्लोर
अधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा 'नागिन डान्स'

बुलडाणा : सलग दोन वर्ष रखडलेल्या फुटपाथच्या कामाकडे लक्ष वेधून बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखा मार्ग स्वीकारला. फूटपाथच्या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं जावं, यासाठी कार्यकर्त्यांनी चक्क 'नागिन डान्स' करत उपरोधिक शैलीत विरोध व्यक्त केला. शेगावमधील शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक परिसरातल्या फुटपाथचं काम ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आलं होतं. मात्र हे काम मागील दोन वर्षांपासून रखडलेलं आहे. तसंच ईगल कन्स्ट्रक्शनने तिथलं कार्यालय गुंडाळल्याने हे काम कोण करणार हा प्रश्न आहे. सावर्जनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी करुनही अधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने अखेर कार्यकर्त्यांनी काल आंदोलनासाठी अनोखा मार्ग स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अमित जाधव यांनी कार्यकर्त्यांसह विश्राम गृहात विकास आराखड्यासाठी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत धडक दिली. या अधिकाऱ्यांसमोर अचानक 'नागिन डान्स' करुन गोंधळ उडवून दिला. पाहा व्हिडीओ
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















