एक्स्प्लोर

सत्तेत सहभागी होणार नाही, भाजपला बाहेरून पाठिंबा : संग्राम जगताप

आम्ही सत्तेत सहभागी होणार नाहीत. भाजपला केवळ बाहेरून पाठिंबा दिला आहे. शहर विकासासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. आम्ही महापालिकेत कोणतेही पद घेणार नाही. तसेच पक्षाला भूमिका समजून सांगणार असल्याचेही संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.

अहमदनगर :  अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे भाजपला पाठिंब्याचे प्रकरण नवे वळण घेत आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आता या प्रकरणात नवे विधान केले आहे. आम्ही सत्तेत सहभागी होणार नाहीत. भाजपला केवळ बाहेरून पाठिंबा दिला आहे.  शहर विकासासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. आम्ही महापालिकेत कोणतेही पद घेणार नाही. तसेच पक्षाला भूमिका समजून सांगणार असल्याचेही  संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती.महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.  त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. नगरच्या निवडणुकीतील प्रकारची लाज वाटते : जितेंद्र आव्हाडांचे ट्विट अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. दुसरीकडे मात्र सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवून त्याच पक्षाच्या सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकरणाची लाज वाटत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असली तरी राष्ट्रवादीचे बडे नेत्यांनी या प्रकरणी चुप्पी साधली आहे. असे असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपली भूमिका सडेतोडपणे मांडली असून नगरच्या निवडणुकीतील प्रकारची लाज वाटते असे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मेन्शन केले आहे. पत्रकार विजय चोरमारे यांच्या ट्विटला उत्तर देताना आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला? अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. मात्र नगरमध्ये शिवसेनेचा गेम कसा काय झाला, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक गाजली, ती तिथे झालेल्या अनपेक्षित युतीमुळेच. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा निकाल लागला. 68 जागा असलेल्या अहमदनगरमध्ये बहुमतासाठी 35 जागांची बेगमी करावी लागते. अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली. अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना  24 राष्ट्रवादी 18 भाजप 14 काँग्रेस 5 बसपा 4 सपा 1 अपक्ष 2 पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली. अहमदनगरमध्ये कमळ कसं फुललं? भाजप            14 राष्ट्रवादी         18 बसपा             04 अपक्ष             01 एकूण            37 शिवसेनेचा गेम कसा झाला? शिवसेनेचे अहमदनगरमधील सूत्रधार अनिल राठोड हे खासदार दिलीप गांधी यांच्याशिवाय भाजपची साथ घेण्याचा अट्टाहास करत होते. त्यामुळे भाजपकडे शिवसेनेचा कोणताही अधिकृत प्रस्तावच गेला नाही. भाजपने 'आपल्याला हवा तसा' प्रस्ताव पाठवावा, असा शिवसेनेचा हट्ट होता. बहुदा भाजप तटस्थ राहील आणि बसप, तसेच तीन अपक्षांच्या साथीने आपला महापौर होईल, असा त्यांचा कयास होता. भाजपचे चाणक्य त्याचवेळी नेमकं काय करावं, या पेचात होते. भाजप आमदार शिवाजी कर्डीले गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना 'सह्याद्री'वर भेटले. आमदार कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या संपर्कात आले. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर-उपमहापौर आमचाच होईल, असा दावा केला. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सकाळी भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. भाजप नगरसेवकांच्या जोडीनेच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सभागृहात गेले. भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांना एकत्र पाहून शिवसेनेचा गेम झाला, हे उघड झालं. अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापौर निवडणुकीतली ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली आहे. देशासह राज्यात आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच राजकीय वळण घेतलं. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होतोय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget