सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील 4 नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येते हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) व गोट्या सावत यांचा संबंध लावून पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश व माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.


कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.  


महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे बळाचा व अधिकाराचा गैरवापर करून नाहक प्रकरणात आमदार नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लक्षात ठेवा केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये असा सूचक इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. 


अजित पवार यांच्यावर टीका
"मी 100 कोटी देऊन जा म्हणालो होतो. लघुपाटबंधारेचे टेंडर अद्याप झाले नाही. तेरा कोटी मागितले होते त्या पैकी 6 कोटी आले पण एकही रुपया खर्च झाला नाही. बजेटची भाषा करतात त्यांना बजेट अर्थात अर्थसंकल्प नेमका समजतो का?" असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावला.


"त्यांच्या कार्यकर्त्यांनाच अजित पवार अक्कल लागते म्हणाले. त्यांनीच भ्रष्टाचार केला आहे. संचयनी सारख्या गोष्टीत भ्रष्टाचार केला. त्यामुळे कारभार करण्यासाठी अक्कल लागते. जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी अकलेचे काय तारे तोडलेत हे जनतेला आता कळून चुकले आहे" अशी टीका अजित पवार यांच्यावर नारायण राणे यांनी केली.   


महत्वाच्या बातम्या