IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफिकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आज सेंचुरियन येथे सुरूवात झाली. सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावे राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 3 बाद 272 धावा झाल्या आहेत.
दिवसाचा खेळ संपताना के. एल. राहुल ( KL Rahul) 122 आणि अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane ) 40 धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफिकेच्या लुंगी एनिग्डीने सर्वच्या सर्व म्हणजे तीन्ही विकेट आपल्या नावे केल्या.
के. एल राहुलच्या नावे नवा विक्रम
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी शतक झळकवणाऱ्या के. एल. राहुलने आपल्या नावे नवा विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेत शतक करणारा राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी 2007 मध्ये वसीम जाफर यांनी अफ्रिकेच्या मैदानावर शतक ठोकले होते. त्यानंतर आता आफ्रिकेच्या मैदानावर शतक करणारा राहुल दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेत के. एल. राहुलचे हे पहिलेच शकत आहे. तर कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक आहे. विशेष बाब म्हणजे राहुलच्या सात शतकांपैकी सहा शकते ही परदेशातील मैदानांवर आहेत. राहुल आपल्या कसोटी कारकीर्दीमधील 41 वा सामना खेळत आहे. यामधील 14 कसोटी भारतात खेळल्या आहेत. घरच्या मैदानावर राहुलचे एकच शकत झाले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ओमायक्रॉनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची तिकीटे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिका बोर्डाने मागील काही दिवसांपूर्वी कोरोना नियमांचे पालन करून दोन हजार लोकांना मैदानात जाण्याची परवानगी दिली होती. परंतु, आता खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन तिकीट विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर सामन्यांसाठी हा निर्णय लागू असले की नाही, याबाबत आफ्रिकी बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आफ्रिकी बोर्डाने सांगितले आहे. पहिला सामना मात्र, प्रेषकांशिवाय होणार आहे.
महत्वाच्या बातम्या