एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर, राजीनामा देण्याचा निर्णय मागे

राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान (मंत्रीपद) न मिळाल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळालं आहे.

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान (मंत्रीपद) न मिळाल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळालं आहे. आज मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत सोळंके यांची चर्चा झाली आणि त्या बैठकीनंतर आपण राजीनामा देणार नसल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले आहे. सोळंके यांचं पक्षाकडून समाधान झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे सोळंके यांना चर्चा करण्यासाठी पक्षाने मुंबईत पाचारण केलं. आमच्यात योग्य चर्चा झाली आहे. पक्षातील सर्व नेत्यांचा कार्यकर्त्याचा योग्य सन्मान ठेवायला हवा, ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आहे. आमच्यात झालेल्या चर्चेनंतर सोळंके यांचं समाधान झालं आहे. त्यामुळे सोळंके पक्षावर नाराज असल्याच्या प्रश्नावर आता पडदा पडला आहे.

प्रकाश सोळंके यांनी प्रसासमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा (राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं) ही माझी भूमिका होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे माझी पक्षावर नाराजी होती. आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि सक्रीय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा मी विचार करत होतो. परंतु कार्यकर्त्यांनी मला माझा निर्णय मागे घेण्यास सांगितले.

सोळंके म्हणाले की, आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मी चर्चा केली, यातून माझं समाधान झालं आहे. माझे आणि शरद पवारांचे बोलणे झाले आहे. पवारांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेत आहे. मला मंत्रीपद नको, मला केवळ सन्मानाने काम करण्याची संधी द्यावी, ही माझी इच्छा आहे, त्याबद्दल मी पक्षातील नेते आणि शरद पवार यांना सर्व काही सांगितलं आहे.

अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रीमंडळात संधी द्यावी, अशी सोळंके यांची इच्छा होती. त्यात काहीही गैर नाही. आम्ही त्यांची समजूत काढून या वर्षाचा शेवट गोड केला आहे.

पाहा जयंत पाटील आणि प्रकाश सोळंके काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
LPG Crisis: गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget