एक्स्प्लोर

शरद पवारांकडून नवाब मलिकांचे समर्थन; म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला एक्सपोज …’

Sharad Pawar : दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. तसेच नवाब मलिकांच्या कामाचं कौतुकही केलं.   

Sharad Pawar : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून तपास यंत्रणांच्या विरोधात पुरावे सादर करत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर त्यांनी वांरवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपास यंत्रणाचा भाजप वापर करत असल्याचेही मलिकांनी अनेकदा आरोप केले. त्यावरुन भाजपनं राष्ट्रवादी आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. नवाब मलिक यांना टीकेचाही सामना करावा लागला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिकांच्या या कामाचं समर्थन केलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. तसेच नवाब मलिकांच्या कामाचं कौतुकही केलं.   

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.याप्रसंगी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘अधिकारांचा गैरवापर जिथं होत आहे त्याला एक्सपोज करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गैरप्रकार रोखणे आवश्यक आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचं समर्थनं केलं. सीमित कार्य काळाकरता ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेने पाहिलं आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’ असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला. देशात भाजपाला पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान यावेळी शरद पवार यांनी केलं.

भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातल्या ठरावावर शरद पवार यांनी दिल्लीत खरपूस टीका केली. भाजपच्या राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याची खोचक टीका शरद पवार यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Rahul Gandhi Student Protest: राहुल गांधी आक्रमक, विद्यार्थ्यांच्या तीन नव्या मागण्या मांडल्या, थेट पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी
राहुल गांधी आक्रमक, विद्यार्थ्यांच्या तीन नव्या मागण्या मांडल्या, थेट पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget