यावेळी ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोक बोलत नाहीत. त्याचा हे फायदा घेत आहे. लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज आहे, असं पवार म्हणाले.
ते म्हणाले की, कारखाने सुरू न होणे हे देशासाठी चिंताजनक बाब आहे. टॅक्सेस वर मोठा परिणाम झालाआहे. यामुळं राज्य सरकारच्या वेतनावर परिणाम झाला. आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा झाले. अन्य राज्याच्या तुलनेत आपले राज्य चांगले होते पण अशा परिस्थितीत संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात आली आहे.
पवार म्हणाले की, भारत-चीन युद्ध होईल असं वाटत नाही. त्यांनी खुरापत काढली. तिथला रस्ता आपण काढतोय तो आपल्या हद्दीत आहे. सियाचिन आपला भाग आहे. म्हणून तो रस्ता केला आहे. त्यांची लोक रस्त्यावर येतात म्हणून धर पकड सुरु आहे. 1993 साली हिमालय बॉर्डर वर सैन्य कमी करण्याचा निर्णय झाला होता. नरसिंग रावांनी करार केला होता. दोन्ही देशानी बंदुकीचा वापर करायचा नाही असा करार झाला.
साखर उद्योगाबाबत बोलताना ते म्हणाले की, 15 ते 20 ऑक्टोबर रोजी साखर कारखाने सुरू होतील. मंत्री मंडळाने निर्णय घेतला आहे. एक्सपोर्टच्या अडचणी कशा दूर करता येतील. काही ठिकाणी साखर गेली होती पण उतरायला लोक नव्हती. कष्ट करणारा कामगार गावाकडे गेला आहे. हळू हळू आपण या अडचणी दूर करत आहोत, असं ते म्हणाले.
कोरोनाचे इंजेक्शन निघाले आहे पण आपल्याला ते परवडणारे नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारे नाही. आत्मविश्वासाने उभं राहणे. काळजी घेणे. हाच पर्याय आहे. आपल्याला कोरोना सोबत जगावे लागणार आहे, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- कामगार नाही, एक्सपोर्टच्या अडचणींमुळे साखर कारखानदार अडचणीत
- राजू शेट्टी यांचा पार्लमेंट मधील अभ्यास चांगला आहे. त्यामुळे त्यांना घेतलं.
- राज्यात तीस तारखेपासून बससेवा सुरु करण्याचा विचार होता.
VIDEO | पाहा शरद पवार काय म्हणाले, संपूर्ण व्हिडीओ