धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ठराव केवळ मंजूर न करता त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय देखील या सभेत घेण्यात आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचा ठराव करणारी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका ही देशातील पहिली नगर पालिका ठरली आहे.


देशात चिनी उत्पादनांची विक्री करून चिनी कंपन्या अब्जावधी रूपये कमावून त्यावरून हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्याच देशाच्या सैनिकांच्या विरोधात करतो, शिवाय संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना सारख्या महामारीची उत्पत्ती देखील चीनमध्ये झाली आहे, त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण जग हैराण झालं आहे. त्यामुळे चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी उत्पादनांवर दोंडाईचा शहरात विक्री करण्यास बंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी पालिकेची विशेष सभा घेवून केला आहे. देशात अधिकृत ठराव करून चिनी सामानांवर बंदी घालणारी दोंडाईचा नगरपालिका ही पहिलीच पालिका ठरली आहे.


पाहा व्हिडीओ : चीनकडून युद्धाचा धोका, अमेरिकी सैन्य भारताच्या मदतीला; जर्मनीतील सैन्य दक्षिण आशियात तैनात करणार



धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या समोर असलेल्या शिवाजी उद्यानात पार पाडली. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आलेत. तत्पूर्वी सुरवातीला चीनच्या सिमेवर शहीद झालेल्या जवानांना सभागृहात श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, मुख्याधिकारी दिपक सावंत, यांच्यासह पालिकेचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.


विशेष सभेच्या सुरुवातीला चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला. त्यानंतर चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेत नगरसेवकांनी चीनविरोधी पोस्टर झळकवत चीनचा निषेध नोंदवण्यात आला आहे.


दरम्यान, दोंडाईचा पालिकेची विशेष सभा संपन्न झाल्यानंतर पालिकेच्या सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय - चीन मुळे संपूर्ण जगात कोरोना आला एवढेच नव्हे तर चीनच्या वस्तू आमच्या भारत देशात विकत घेऊन आम्ही भारतीय चीनची अर्थव्यवस्था मजबूत करीत असतो, त्याच पैशाने चीन हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्या देशावर करीत असतो म्हणून चीन ला धडा शिकविण्यासाठी सर्व भारतीयांनी चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करावा. आम्ही दोंडाईचा शहरात यापुढे चीनच्या कोणत्याही वस्तू विक्री करु देणार नाहीत दोंडाईचा प्रमाणे इतर महापालिका आणि नगरपालिकांनी देखील असा ठराव करून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार करावा असे आवाहन माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


बोगस बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटो याचिका, माझाच्या बातमीची दखल


सुस्थितीतील एसटी बसेस टप्याटप्प्यानं एलएनजी इंधनावर रूपांतरित करणार!


असा चालतो शेतकऱ्यांचं महामंडळ समजल्या जाणाऱ्या 'महाबीज'चा कारभार