देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. गणेश मूर्ती चार फुटांपर्यंतच असावी, मुख्यमंत्र्यांची सर्व गणेश मंडळांना विनंती; नियमांच पालन करुन उत्सव साजरा करण्याची अपेक्षा

  2. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांचे निर्देश

  3. घरकामगार, वाहन चालकांना सोसायटीत प्रतिबंध करु नका, सहकार विभागाच्या परिपत्रकाद्वारे सूचना; गृहनिर्माण संस्थांच्या मनमानीला चाप

  4. कोरोनामुळे शिक्षकांना यापुढेही वर्क फ्रॉम होमची सूट; गरज पडल्यास आठवड्यातून दोन दिवस शाळेत जावं लागणार, राज्य सरकारचं परिपत्रक

  5. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढताचं; राज्यात काल सर्वाधिक 5024 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्णसंख्या दीड लाखांच्या पार

  6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यभरातील शाळांना फी वाढीची मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

  7. कोविड 19 मुळे दगावलेल्यांच्या मृतदेहांचं व्यवस्थापन आणि अंत्यसंस्कार कसे केले जातात?, अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

  8. कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या 40 हजारांच्या इंजेक्शनचा खर्च मनपाने करावा; प्रवीण दरेकर यांची नवी मुंबई मनपा आयुक्तांकडे मागणी

  9. एबीपी माझा इम्पॅक्ट; अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली; बहुचर्चित बेपत्ता मुलींच्या प्रकरणात हलगर्जीपणा आणि असंवेदनशीलतेचा ठपका

  10. चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला जावं, भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांचं वक्तव्य