एक्स्प्लोर

विचित्र वक्तव्य करून भाजपचे नेते आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात, प्रवीण दरेकर यांच्यावर जयंत पाटील यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळे विचित्र वक्तव्य करत असतात. त्यातून ते त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. महिलांबाबत अशी विधानं करणं अत्यंत गैर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : महिलांबाबत अशी विधानं करणं अत्यंत गैर आहे. मुळात ते असं बोलूच कसे शकतात हाच प्रश्न आहे. भाजपचे नेते असे विचित्र वक्तव्य करतात आणि त्यातून आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. कदाचित त्यांच्या पक्षातचं तशी पद्दत असेल. दुर्दैवी बाब ही आहे की, आशा वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली. 

रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष म्हणणाऱ्या प्रवीण दरेकरांवर राष्ट्रवादीचा पलटवार, गाल अन् थोबाड रंगवू शकतो, दिला इशारा

पुणे जिल्ह्यातील शिरूर मध्ये उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला आहे. याविरोधात आता ठीक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात येत आहेत. याआधीच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलनं करू असा इशारा दिला आहे. 

दरमान्य याबाबत अधिक बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळे विचित्र वक्तव्य करत असतात. त्यातून ते त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. महिलांबाबत अशी विधानं करणं अत्यंत गैर आहे. त्यामुळे त्यांचा जितका निषेध करता येईल तो कमी आहे. ते असं कसं बोलू शकतात हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात तशी पद्धत असेल. आम्ही अशी टोकाची विधानं करत नाही, अशा वक्तव्याना वारेमाप प्रसिद्धी मिळते हे दुर्दैवी आहे.

 यानंतर राज्यातील वीज वितरण विभागाची 63 हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली कशी याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आमचं सरकार असताना 10 हजारांच्या आसपास थकबाकी होती ती त्यानंतर वाढत गेली. त्यांनतर 2014 साली भाजप सरकार सत्तेत आलं. भाजप सरकारने याबाबत काहीच केलं नाही. आता थकबाकीचा एवढा मोठा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या थकबाकीला सर्वस्वी जबाबदार 2014 साली आलेलं सरकार कारणीभूत आहे असं मला वाटतं.

 यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी बोलताना पाटील म्हणाले,कोर्टाने जाहीर केल्यामुळे आता निवडणुका होत आहेत मात्र इतर निवडणूकांमधून मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरचं मुख्यमंत्री बैठक घेतील. सध्या सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत त्यामुळे 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. मात्र पुढील निवडणूका या ओबीसी आरक्षणासोबत होतील असा आम्हाला विश्वास आहे. तसा आमचा प्रयत्न सुरू आहे. इतर राज्यात जो कायदा करण्यात आला आहे तसाच कायदा आम्ही देखील करणार आहोत. राज्य सरकारचे तसे प्रयत्न सुरू आहेत

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget