मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इस्रायल दुतावासातील अधिकाऱ्याला  अशीही बनवाबनवी' हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला आहे. जगभरातील लोकांचे भारतीय सिनेसृष्टीवरील प्रेम काही नवे नाही. भारतीय सिनेसृष्टीवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला सापडेलच. अशाच भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी हा सल्ला दिला आहे. 


जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी यांनी  भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना ‘अशीही बनवा बनवी’ हा मराठी चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे.






दोघांमध्ये चित्रपटांवरून चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी कोबी शोशानी यांना काही मराठी चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. खास करून जयंत पाटील यांनी कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. शिवाय चित्रपटात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला 34 वर्षे पुर्ण झाली आहेत. परंतु, 34 वर्षानंतर आजही या चित्रपटाची जादू चाहत्यांच्या मनावर आहे. खळखळून हासायला लावणाऱ्या या विनोदी चित्रपटाला आजही चाहते डोक्यावर घेतात. या चित्रपटात आपल्या विनोदाने पोट धरून हसायला लावणारे अभिनेते अशोक सराफ, विनोदाचा बादशाह अशी मराठी चित्रपटसृष्टीत ओळख असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेते सचिन पिळगावकर,  सुधीर जोशी, अभिनेत्री अश्विनी भावे, अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे यांनी काम केलं आहे.  


महत्वाच्या बातम्या