Sushil Kumar Shinde: 2014 नंतर अग्रेसिव्ह प्रचार करणारा मोदी सारखा नेता मिळाला. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. मोदींनी सोलापूरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र  एक ही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले, असं काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत. 


'तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली'


यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत की, ''तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं मला वाटत. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही. आम्ही 10 वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही अॅक्टिव्ही नव्हतो. त्यामुळे संघटना बांधनी झाली नाही. एकट्या राहुल गांधीना दोष देणे शक्य नाही, पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता.'' यावेळी बोलताना त्यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर ही भाष्य केलं आहे. ते म्हणाले,  ''नवजोतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही, खेळात जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न केले. मुख्यमंत्री सोबत जमवून घेतले नाही.''

जात धर्माचे राजकारण जास्त काळ चालणार नाही  


सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सध्या जात, धर्मावर सर्व राजकारण सुरु आहे. हे जास्त काळ चालणार नाही, सगळं बदलेल. लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाही. काँग्रेसकडे हे भाजप पेक्षा वेगळं आहेत.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानायला हवे. कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांनी मान्य केलं, ते अवलंब करत आहेत. तीन पक्ष सोबत घेऊन चालने कठीण आहे, तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत, असं ते म्हणाले आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सीबीआय, ''ईडी यांचा वापर कधी असा झाला होता का? याबद्दल जास्त न बोललेल बरं.''