एक्स्प्लोर

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा; एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका

माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचं नीच राजकारण करण्यात आलं. ज्या पक्षाला मी लहानाचं मोठं केलं तो पक्ष सोडावा वाटत नव्हता, अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.

जळगाव : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून ते सातत्याने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधत आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हणत आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं. एकनाथ खडसेनंतर आता त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत. आज मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात त्यांच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मी स्पर्धक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचं नीच राजकारण करण्यात आलं. ज्या पक्षाला मी लहानाचं मोठं केलं तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा असं वाटलं. मी पक्ष सोडला नाही, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असं एकनाथ खडसे म्हणाले.

पुढे खडसे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिलं अस सांगितलं जातं. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे दिली आहेत. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी उभा राहिलो आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझी छळवणूक सुरूच राहिल्याने मी पक्ष सोडला, काय चूक केली. अन्याय होत असताना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते. म्हणून निर्णय घ्यावा लागला.

पक्षाने एका व्यक्तीचे लाड केल्याने संपूर्ण महाराष्ट्रच वाटोळं झालं आणि मिळणार असलेली सत्ताही गेली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मला तिकीट मिळणार नाही हे भाजपचे राष्ट्रीय समन्वय असलेले डॉ. राजेंद्र फडके हे माझ्या व्याह्यांना आधीपासून सांगत होते. मला तिकीट मिळणार नाही यांना कसं अगोदरपासून माहित होतं. अगोदर कोणत्या बैठकीत कट केला असेल तरच हे होऊ शकतं. आपली भाजपच्या विरोधात नाराजी नाही, फक्त एकाच व्यक्तीबाबत आहे, असं खडसे यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget