एक्स्प्लोर
Advertisement
कार्यालयासाठी वीज चोरणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाला अटक
कार्यालयासाठी वीज चोरी केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा युवक अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे.
भिवंडी : कार्यालयासाठी वीज चोरी केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा युवक अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. हारुन खान असे या राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव आहे. हारुन याने न्यू कणेरी येथील कार्यालयासाठी वीजेची चोरी केली होती.
हारुन हा त्याच्या कार्यालयात मीटर नसलेल्या वीजेची जोडणी वापरतो. त्याने आतापर्यंत 90 हजार रुपयांची वीजेची चोरी केली आहे. दंड न भरल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
टोरंट पॉवर कंपनीने हारुन याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. कंपनीच्या तक्रारीनुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार आज त्याला अटक करण्यात आली.
वाचा : मनोहर जोशींच्या मुलाच्या हातून 'कोहिनूर' निसटला, दीड वर्षात इमारत पूर्ण होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
धाराशिव
Advertisement