एक्स्प्लोर

Ajit Pawar On Sharad Pawar Threat : शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता, फेसबुक बायोमध्ये उल्लेख, मास्टरमाईंड शोधा; अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुकवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे?, याचा तपास व्हायला हवा अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

Ajit Pawar ON Sharad Pawar Threat : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी दिल्यांनंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुकवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे?, याचा तपास व्हायला हवा आणि सरकारने त्याच्यावर योग्य कारवाई करायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

'पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही बाहेर असल्याने संपर्क झाला नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याचा तपास करावा आणि सौरभ पिंपळकर याला कोणाचा पाठिंबा आहे का? याचाही तपास करावा. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि कारवाई करावी.  

'बातम्या देताना खातरजमा करत चला'

सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरला औंरंगाबादच म्हणणार असं शरद पवार म्हणाले अशी चुकीची बातमी एका माध्यमाने दिली होती. त्यानंतर त्यांंनी ट्विटरवर दिलगिरीदेखील व्यक्त केली मात्र बातम्या देताना खातरजमा करत चला, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे. 

शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'राजकारण महाराष्ट्राचे' असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस फाटा त्यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

सुप्रिया सुळेंकडून कारवाईची मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर होणार, असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget