एक्स्प्लोर

लायकी बघून बोलावं, सूर्यावर थुंकू नये; पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलनं झाली.आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वक्तव्यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

सातारा : ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो? याचा जराही विचार करत नाही त्याच्यावर आपण काय बोलावं? सूर्याकडे बघून जर थुंकलं तर ती थुंकी आपल्यावरचं पडणार ना? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावर दिली आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. च्याही पक्षाच्या वरीष्ठांना या प्रकणाबद्दल उत्तर देता देता तोंडाला फेस आला असल्याचेही अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

याविषयी दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडल्या आहेत. पवार साहेबांना उभा भारत देश ओळखतो. कुठलही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा अन्य.. पवार साहेबांना बसवत नाही. उमेदीच्या काळात तर ते फिरलेच. पण, या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही. आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो? याचा जराही विचार करत नाही. सूर्याकडे बघून जर थुंकलं तर ती थुंकी आपल्याचं अंगावर पडणार ना?, अशी तिखट प्रतिक्रिया पवार यांनी दिली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

नको तितकं महत्व दिल्याने हे प्रकार होतात जी व्यक्ती बोलली त्यांचा स्वभावचं तसा आहे, पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषय देखील बोलले होते. एखाद्याला नको तितकं महत्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं, त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी सर्वांची डिपॉजिट जशी जप्त केली तसं याचही डिपॉजिट जप्त केलं यावरुन जनाधार त्यांच्या किती मागे आहे, हे राज्यानं ओळखलं आहे. निवडणूक काळात ज्या पद्धतीने पवार साहेबांनी प्रचार केला. त्यात सातरची सभा देशभर व्हायरल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार साहेबांचे कौतुक केलंय. त्यामुळे अशा गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटी म्हणाले.

ज्यांना लोकांनी बाजूला केलं त्यांची आपण दखल का घ्यायची? : शरद पवार

गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची आता गरज नाही. पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार

महत्त्वाच्या बातम्या

मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Sanjay Gaikwad: शेतकरी कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलतात, त्यांच्या अंतिम संस्कारलाही कुणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाडांचीही उद्विग्न प्रतिक्रिया, शेतकऱ्यांना सल्ला देत म्हणाले...
शेतकरी कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलतात, त्यांच्या अंतिम संस्कारलाही कुणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाडांचीही उद्विग्न प्रतिक्रिया, शेतकऱ्यांना सल्ला देत म्हणाले...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget