एक्स्प्लोर

पालघर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेसोबत हातमिळवणी! राष्ट्रवादी आमदार अनभिज्ञ

पालघर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा खुद्द आमदार या गोष्टीपासून अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

पालघर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकी मधील प्रचारात रंगत वाढू लागली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरले असले तरी काही जागांवर छुप्या आघाड्या केल्या जात आहेत. वाडा तालुक्यात मनसे भाजप सोबत गेली असताना, पालघर तालुक्यात मात्र मनसेने राष्ट्रवादी सोबत घरोबा केला आहे. पालघर तालुक्यात पंचायत समितीची जिंकलेली एक जागा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारी मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार सुनील भुसारा मनसे सोबत केलेल्या आघाडी बाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आमदारांनाच आपला पक्ष गोपनीय गोष्टींपासून दूर ठेवत आहे की काय अशा चर्चेला उधाण आले आहे.

वर्षभरापूर्वी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माण पंचायत समिती गणात मनसेचे योगेश पाटील निवडून आले होते. पालघर तालुक्यातून मनसेचा एकमेव उमेदवार निवडून आल्याने मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माण पंचायत समिती गणातील सदस्य पद रद्द झाले होते. त्यानंतर पडलेल्या आरक्षणात माण पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

मनसेने जिंकलेली एक जागा कायम राखण्यासाठी उमेदवाराने कंबर कसली आहे. त्यासाठी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपसात संगनमत करून एकमेकांना मदत करण्याचे ठरवले आहे. माण पंचायत समिती गणात मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत केली आहे. त्याबदल्यात धुकटन पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला आहे.

मनसेच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो 
पालघर तालुक्यात मनसे उमेदवाराच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनर वर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा फोटोला स्थान देण्यात आले आहे. राज्य स्तरावर मनसेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत असताना पालघर तालुक्यात मनसे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची चर्चा पालघर तालुक्यात जोर धरत आहे. वाडा तालुक्यात भाजप सोबत आणि पालघर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करणाऱ्या मनसे बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडी बाबत आमदार सुनिल भुसारा हे अनभिज्ञ असल्यामुळे विविध विषयांना फाटे फुटताना दिसत आहे.

मनसे सोबत केलेल्या हातमिळवणी बाबत मला माहिती नाही : राष्ट्रवादी आमदार सुनील भुसारा 
मोखाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे सोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. इतर तालुक्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जात आहे. पालघर तालुक्यात मनसे सोबत केलेल्या हातमिळवणी बाबत मला माहिती नाही. परंतु माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिलीय.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget