नवी दिल्ली : आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे स्वत: एक बंदर आहेत. ते कुठेही उड्या मारतात. किंबहुना 2014 मध्ये ते चुकून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही उत्तर द्यायची गरज नाही. तर काचेच्या घरात तू राहतोस, तुमच्या घरी सख्खा भाऊ राहत नाही, तुम्ही काय काचेच्या घरावर बोलणार, अशा तीव्र शब्दात भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या टीकेला राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.


'तेरे बाल भी नकली और तेरी चाल भी नकली'- सलील देशमुख


ज्यांचे केस खोटे ते काय दुसऱ्याला फॅशनेबल म्हणणार. 'तेरे बाल भी नकली और तेरी चाल भी नकली' असा खोचक टोलाही सलील देशमुख यांनी आशिष देशमुखांना लगावला आहे. ते नवी दिल्ली येथे बोलत होते. आशिष देशमुख प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. त्यांना आचार नाही अन् त्यांना विचार देखील नाही. मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत त्यांना वडिलांच्या पुण्याईने मत मिळाली होती, आता तीही मिळणार नाही. आता घरची लोक त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांना आपण काय सिरियस घेणार, किंबहुना त्यांना आता उत्तर द्यायचीही गरज नसल्याचे वक्तव्य सलील देशमुख यांनी केलं आहे. 


काय म्हणाले होते आशिष देशमुख?


अनिल देशमुख गेले दोन वर्ष निष्क्रिय राहिले, मतदारसंघात त्यांनी काही काम केले नाही. मात्र आता निवडणुकीच्या वेळेला भाजप विरोधात त्यांना निवडणूक लढवायची आहे. हेच लक्षात घेऊन ते खोटे आरोप करत आहेत. असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला होता. या सोबतच पुढे बोलातान ते म्हणाले होते कि, अनिल देशमुख माझे कुटुंबिय सदस्य आहेत.  म्हणून मला त्यांची चिंता आहे. मात्र काका (अनिल देशमुख) यांनी लक्षात ठेवावे, जे स्वतः काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्याच्या घराला दगड मारत नाही. असा टोलाही आशिष देशमुख  यांनी अनिल देशमुखांना लगावला आहे. आता या टीकेला  प्रत्युत्तर देत सलील देशमुख यांनीही पलटवार केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या