Nagpur News नागपूर : राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे (Assembly Elections2024) आता संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू केली. त्याचबरोबर बैठका, सभा, मेळावे, पक्षांतील पदांवरील नेमणुका आणि पक्षांतर  घडामोडींनाही आता वेग आला आहे. अशातच आणखी निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू करण्याचे आदेश राजकीय पक्षातील बड्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.


मतदारसंघनिहाय प्रत्येक नेत्याने कंबर कसली असून त्या अनुषंगाने मोर्चे बांधणी केली जात आहे. अशातच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांचे पुत्र सलील देशमुख हे ही इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. 


शरद पवार,संजय राऊत सुप्रिया सुळे यांच्या भेटीत शिक्कामोर्तब?


काटोल आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथून अनिल देशमुख निवडणूक लढत आले आहे. मात्र यंदा माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. असे असले तरी अनिल देशमुख हे जर तिथून लढले आणि पक्षाने मला दुसऱ्या मतदारसंघातून लढण्यास सांगितले, तर मी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार. आणि पक्षाने काटोल मधून लढण्याचे निर्देश दिले, तर काटोल मधून निवडणूक लढवणार, असे सलील देशमुख म्हणाले. या अनुषंगाने त्यांनी सलील देशमुख यांनी नुकतीच शरद पवार, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


दरम्यान, या भेटीत काही राजकीय खालबाते झाल्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी काटोलमधील विकासकामांचा पाठपुरावा करत त्यांच्या वतीने जनसंपर्क ठेवला होता. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे आहे. 


संपूर्ण देशात इंडिया आघाडीला मोठे यश


देशभरात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीकडनं जवळ जवळ सर्व निकाल लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. सोबतच आगामी काळात देखील असं चित्र कायम राहणार आहे. इंडिया आघाडी प्रत्येक राज्यात मोठ्या ताकतीने निवडणुकांसाठी पुढे जात आहे.  इंडिया आघाडी प्रत्येक राज्यातील निवडणुकांमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढत आहे. त्यामुळेच अतिशय चांगले यश देखील आम्हाला मिळत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या