एक्स्प्लोर

Eknath Khadse : हा फक्त ट्रेलर, भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर; एकनाथ खडसे यांचं वक्तव्य 

Eknath Khadse : अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भाजपच्या तीस नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Eknath Khadse : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भाजपच्या तीस नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला तसेच राष्ट्रवादीमध्ये यानंतरही अनेक नेते प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं.  हा फक्त ट्रेलर आहे, अजून अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे.  यावेळी बोलताना खडसे म्हणाले की,  माझ्या पक्षप्रवेशानंतर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुढील काळात अजूनही अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. आज हे त्याचं फक्त ट्रेलर आहे, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचा उधाण आलेय. 

खडसे म्हणाले की,  'ज्या पक्षाला मोठे करण्यासाठी आपण मेहनत घेतली, तो पक्ष खडसे यांना झाला नाही तो आपल्याला काय होणार? अशी भावना भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. मी राष्ट्रवादी पक्षात आल्यावर अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. पुढील काळात आणखी काही जण राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अजित दादा तुम्हाला यापुढेही जळगावला यावं लागेल.' यावेळी बोलताना खडसे यांनी भाजप आमदार संजय सावकारे ही आमचेच असल्याचं सांगितलं. त्यामुळे संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.  

भुसावळ नगर पालिकेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळ्यातील भाषणात बोलताना एकनाथ खडसे यांनी आमदार सावकारे यांनी रस्त्याच्या कामाला तीन कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितलं. तसेच तुम्ही आमचेच आहात असे सांगितलं. खडसेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावेळी खडसे यांनी आपलं वाक्य दुरुस्त करीत भुसावळ शहराचे असल्याचं सांगितलं. तरीही खडसे यांना काय सांगायचं होत ते सगळ्यांना समजलं. 
 
अजित पवार काय म्हणाले?
भुसावळ येथील राष्ट्रवादी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, 'जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र काही जणांना सोन्याची किंमत कळली नाही. मात्र राष्ट्रवादीला ती कळली. खडसे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने जळगाव जिल्हा हा आधीप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होण्यास वेळ लागणार नाही.' खडसे यांनी ज्या पक्षाला लहानाचे मोठे केले, त्याच पक्षाने त्यांचा अपमान केला. खडसेंवर खोटे आरोप लावण्यात आले. ज्यांनी त्या पक्षाला मोठे केले त्याच एकनाथ खडसे यांना त्यांचा पक्ष झाला नाही, तो आपल्याल काय होणार? अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये भावना असल्यानेच अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे, असे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget