मुंबई: राष्ट्रवादीच्या गोटातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून शरद पवार  ( Sharad Pawar ) गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवारांना ( Ajit Pawar ) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनीही त्यांचं प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण... अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) की श्रीनिवास पाटील ( Shriniwas Patil ) ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण किंवा फौजिया खानही सध्या शरद पवारांसोबत असून त्यांच्यापैकी एक खासदार तर नसेल अशीही चर्चा आहे. 


नुकतेच अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी विधीमंडळ कोर्टमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाला समर्थन करणारा हा खासदार आणि आमदार सध्या शरद पवार गटामध्ये असला तरी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित आमदाराला आमदाराला वगळून अजित पवार गटाकडून उर्वरीत 10 आमदारांविरोधात विधीमंडळात कारवाईसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. 


शरद पवार गटाकडील खासदार


राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बहुतांश आमदारांनी त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांच्या त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या शपथविधीवेळी उपस्थित असणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नंतर शरद पवार गटाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यसभेच्या वंदना चव्हाण आणि फौजिया खान या सुरूवातीपासूनच शरद पवारांसोबत आहेत.


दरम्यान, विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी ( NCP ) आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे. 


शरद पवार गटातील खासदार


1) श्रीनिवास पाटील
2) सुप्रिया सुळे
3) डॉ. अमोल कोल्हे


4) वंदना चव्हाण


5) फौजिया खान 


 


शरद पवार गटातील आमदार


1) जयंत पाटील
2) जितेंद्र आव्हाड
3) रोहित पवार
4) सुमन पाटील
5) अशोक पवार
6) सुनील भुसारा
7) प्राजक्त तनपुरे
8) बाळासाहेब पाटील
9) अनिल देशमुख
10) राजेश टोपे 
11) संदीप क्षीरसागर 


तटस्थ


1) नवाब मलिक


ही बातमी वाचा: