मुंबई: महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे सर्व मीटर (Electricity Meters) बदलले जाणार असून त्या ठिकाणी आता नवे स्मार्ट मीटर (Smart Meters) बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 26 हजार 921 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंबंधीत आज सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागातले मीटर अदानी ग्रुप कंपनीकडून (Adani Group) बदलण्यात येणार आहेत.


RDSS योजनेंतर्गत DBFOOT आधारावर महाराष्ट्र राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदात्याची नियुक्ती आज झाली. उर्जा मंत्रालयाकडून निर्देशानुसार, सरकार भारतातील आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र राज्यात MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी सहा निविदा अंतिम झाल्या आहेत. 


What is Smart Meter : स्मार्ट मीटर म्हणजे काय?


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या तयारीत केली आहे. वेळेवर बिल भरण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी स्वयंचलित वीज खंडीत करण्याची सुविधा असेल. स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत प्रत्येकी 2600 रुपये इतकी आहे. यामध्ये मोबाईल फोनप्रमाणे ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते. 


कोणते स्मार्ट मीटर बसवायचे याची निवड ग्राहकांना द्यावी, अशी सूचना महावितरणने केली आहे. कंपनीने आधीच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना सुरू केली आहे, जी पुरेशा प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22.8 दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे.


ही बातमी वाचा :