Nashik News: राज्यात सत्तांतर (Maharashtra Political News) झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (10 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात ते उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच झालेल्या पदवीधर निवडणुकीमुळे (MLC Election) कॉंग्रेसमध्ये (Congress) निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) याचंं नाशकात (Nashik Political News) आगमन झालं होतं. मराठा विद्या प्रसारक निवडणुकीच्या (Maratha Vidya Prasarak Elections) पार्श्वभूमीवर त्यांनी दोन दिवस मुक्काम ठोकला होता. मविप्रच्या तत्कालीन सत्ताधारी तसेच विरोधी गटाने पवारांची भेट घेतल्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर पोहोचत सत्तांतर झाले. दरम्यान, आज सकाळी साडेअकरा वाजता वीज कर्मचाऱ्यांच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


वीज कर्मचारी संघटनेचं अधिवेशन...


आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे (Maharashtra State Electricity Workers Federation) त्रैवार्षिक महाअधिवेशन आज सकाळी अकरा वाजता होत असून गोल्फ क्लब मैदान इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. आज सकाळी दहा वाजता बी.डी. भालेकर मैदान येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शालीमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, प्रिया हॉटेल, सीबीएस त्र्यंबक नाका, गोल्फ क्लबमार्गे मिरवणूक काढली जाणार आहे. तर 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड येथे प्रतिनिधी अधिवेशन होणार आहे.


पुस्तकाचे प्रकाशन...


मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचा दुपारी दोन वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अॅड. नितीन ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'मजल दरमजल' या गौरव ग्रंथाचे ही प्रकाशन होणार आहे. सत्कार समितीतर्फे कालिदास कला मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एस.एम गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक बार असोसिएशनने केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik BJP Adhiveshan : नाशिकमध्ये भाजपचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता