एक्स्प्लोर

'मी कार्यक्रमाला आलो नसतो तर अमित शाहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं', पक्षांतरावर पवारांची खुसखुशीत प्रतिक्रिया

काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील विधानभवनात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.

मुंबई : माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील विधानभवनात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. मी कार्यक्रमाला आलो नसतो तर अमित शाहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं', पक्षांतरावर पवारांची खुसखुशीत प्रतिक्रिया यावेळी बोलताना शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या राज्यातील पक्षांतराबाबत चिमटा काढला. पवार म्हणाले, "काल रात्री माझं जीभ आणि गळ्याचं ऑपरेशन झालं आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका असं सांगितलं आहे. मग म्हटलं सध्याचं राजकारण पाहता मी आज कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शाह यांना भेटायला गेलो. म्हणून थोडा त्रास झाला तरी मी आलो". पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पाहायला मिळाला. शरद पवारांनी यावेळी बोलताना त्यांची पहिल्यांदा सभागृहात जाण्याची आठवणही सांगितली. "मी पहिल्यांदा सभागृहात आलो होते भाषण ऐकायला. सभागृहात पायावर पाय ठेवून बसू शकत नाही असा नियम आहे. मी चुकून दुसऱ्यांदा पायावर पाय ठेवला तर मर्शनले पकडून बाहेर काढलं होतं. त्यावेळी त्याला म्हंटल आता जातो पण नंतर येईन तेव्हा कायमसाठी. त्यानंतर राज्यात 26 वर्ष आणि देशात 26 वर्ष सभागृहात काम करायची संधी मिळाली", असं पवार यांनी सांगितले. तसेच "हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही", अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपल्या भाषणात अनेक आठवणींना उजाळा दिली. 'सुरवातीच्या काळात नागपूर अधिवेशनात पवार साहेब तुम्ही प्रश्न विचारला, मी राज्यमंत्री होतो. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून मी हे पुस्तक लिहू शकलो', असं पाटील म्हणाले. तसेच 'मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो तर लगेच टीव्हीला पेपरला बातम्या आल्या. "विधानगाथा' गाजली.  गेली पाच वर्ष निवांत वेळ होता म्हणून पुस्तक लिहिले, पुढे असा निवांत वेळ मिळू नये अशी विनंती करतो', असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. राष्ट्रवादीला खिंडार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget