Sharad Pawar: माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत (Sharad Pawar Press Conference) म्हटले.

  


शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतरी संध्याकाळी 5.30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्रकार परिषदेस अनुपस्थित होते. त्याबाबत विचारले असता, शरद पवार यांनी म्हटले की, निवृत्त होण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. आज अजित पवार इथं नाहीत म्हणजे ते नाराज असं म्हणण्याचं काहीच कारण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.


शरद पवार नेमंक काय म्हणाले? 


2 मे रोजी पुस्तक प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षांच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्यामुळे जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेली जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. 


या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, चाहते यांनी मला आवाहन केलं. तसेच देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली.


लोक माझे सांगाती, हे माझ्या प्रदीर्घ आणि समाधानी सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. या लोकांच्या प्रेमानं मी भारवून गेलो. 


तुमच्या सर्वांकडून आलेली आवाहन, आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून घेण्यात आलेला निर्णय यावरून मी सर्वांचा मान राखत मी माझा निर्णय मागे घेत आहे. 


मी पुन्हा अध्यकपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे. 


पक्षात नवं नेतृत्त्व निर्माण होईल यासाठी काही संघटनात्मक बदल मी करणार आहे