Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली असल्याचं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. आता विलंब करुन चालणार नाही असंही ते म्हणाले. मुंबईत (Mumbai) युवक काँग्रेसच्या वतीनं युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करकण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. पक्षसंघटनेत बदलाचे शरद पवारांनी यातून संकेत दिले आहेत.
अधिक काम करणाऱ्याला महापालिका निवडणूक लढवण्याची संधी
शरद पवारांनी बुधुवारी मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची कशी वर्गवारी करायची ते ठरवा. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल असे शरद पवार म्हणाले. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली असल्याचे शरद पवार म्हणाले. ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये
महत्त्वाच्या बातम्या: