Jalgoan News : भाजप शिंदे गटाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मनोगतात राष्ट्रवादीचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना शालजोडे मारून जोरदार टीका केल्याच पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या समोरच त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात संजय पवार यांनी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आपणच असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.


जळगाव (Jalgoan) जिल्ह्यात सद्यस्थिती बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Bajar Samiti Election) रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिंदे गटाचे पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल मैदानात असून काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही आपसात एकमेकांवर निवडणुकांच्या प्रचार सभामध्ये आरोप प्रत्यारोप करत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी धरणगाव बाजार समितीच्या (Dharangoan Bajar Samiti) निवडणुकीतही भाजप शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. संजय पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या एका गटाने धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाला पाठिंबा दिला आहे.


जिल्हा बँक, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत बंडखोरी केल्याने संजय पवार हे संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. आता पुन्हा बाजार समिती निवडणुकीत संजय पवार यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. धरणगाव बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजप शिंदे गट राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलचा मंगळवारी जळगावातील कासोदा येथे मेळावा पार पडला. यावेळी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे पारोल्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांची उपस्थिती होती.


राष्ट्रवादीचे पवार भाजप शिंदे सोबत 


यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. आपण राष्ट्रवादी पक्षातच असल्याचे सांगत, मला पक्षातील काही नेते गद्दार म्हणत आहे, त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे मी सुध्दा बोलत आहे, जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार राहिल, मी मागणी करत आहे,  विधानसभेचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो, त्याचप्रमाणे उमेदवार मी राहिल, माझ्या विरोधात गुलाबराव पाटील असतील किंवा नसतील, याप्रमाणे संजय पवार यांनी उत्तर दिले आहे. 


भाजप शिंदे गटाच्या बॅनरवर अजित पवार


राष्ट्रवादीत असलेल्या काही तथाकथीत नेत्यांना पक्षांने बाजूला करायला पाहिजे अन् तरुणांना संधी दिली पाहिजे, शरद पवार हे जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीवेळी नक्की भाकरी फिरवणार असल्याचा विश्वास व्यक्त करत जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर नव्हे तर आपणच राष्ट्रवादीकडून विधानसभेचे उमदेवार असल्याचा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. भाजप शिंदे गटाच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटा असल्याने त्याबाबत कारवाईचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र काढले आहे. मात्र जयंत पाटील व अजित पवार माझे नेते असून असे कुठलेही पत्र मला मिळालेले नसल्याचे संजय पवार यांनी बोलतांना स्पष्ट केलं आहे.