Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं  (unseasonal rain) हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील भात पिकांसह, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय पिकं, आंबा, बागायती शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.


Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत


भंडारा जिल्ह्यातील रात्रीपासून जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारात रहावं लागलं. मागील काही दिवसात अवकाळी पावसानं कधी जोरदार तर, कधी हलक्या स्वरुपात हजेरी लावली असल्यानं शेतकरी अगोदरचं संकटात सापडला आहे. आता पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पुरता हतबल झाल्याची नामुष्की ओढोवली आहे. या पावसानं भात पिकांसह पालेभाजी, वेलवर्गीय पिकं, आंबा, बागायती शेती, मका यांना चांगलाच फटका बसला आहे.


Latur Rain : लातूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता


संध्याकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरामध्ये थंड वारे वाहत होते. रात्री साडेनऊनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले. जोरदार वारे आणि विजांच्या गडगडासह लातूरमध्ये तुफान पाऊस झाला. तुफान पडणाऱ्या या पावसामुळं घराकडे निघालेल्या अनेकांची मोठी तारांबळ उडाली. लातूर शहर आणि परिसरात असलेल्या अनेक केशर आंब्याच्या बागाला या पावसामुळं फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, काही जिल्ह्यातील उन्हाळी पिकांना फटका