Nawab Malik on Wankhede family : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची फैरी झाडली आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिकांनी ट्वीटरवर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.  समीर वानखेडेचे गैरप्रकार मी गेले ५५ दिवस उघड करत आहे.  वानखेडे कुटुंबीयाची ओळखच दुहेरी असल्याचे मलिक यांनी म्हटले. वानखेडे कुटुंबीय वैयक्तिक जीवनात मुस्लिम राहिले. मात्र, अनुसूचित जातीचे फायदे मिळवण्यासाठी प्रमाणपत्रांवर हिंदू राहिले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. 


नवाब मलिकांनी यांनी सकाळी दोन ट्वीट केले. त्यातील दुसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर आणखी एक आरोप केला.  मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले की, "आणखी एक फर्जीवाडा...अंतिम संस्कार करताना मुस्लिम आणि सरकारी दस्तावेजांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव." असे म्हटले. हा दावा करताना नवाब मलिकांनी काही कागदपत्रांचे फोटोही ट्वीट केले आहेत. 


मुंबई महापालिकेच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीत समीर वानखेडे यांच्या आई जायदा ज्ञानदेव वानखेडे यांची नोंद हिंदू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. महापालिकेच्या नोंदणीनुसार, मृत्यू नोंदणीनुसार जायदा यांचा मृत्यू 16 एप्रिल 2015 रोजी झाल्याची नोंद आहे. यामध्ये त्यांच्या धर्माची नोंद मुस्लिम अशी करण्यात आली आहे.  तर मृत्यू अहवाल  17 एप्रिल 2015 रोजीचा आहे. यामध्ये जायदा वानखेडे यांची हिंदु असल्याची नोंद करण्यात आली आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. 


अवघ्या 24 तासांत मनपाच्या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नोंदी असल्याची बाब उघड झाली असल्याचं नवाब मलिकांचं म्हणणं आहे. मृत्यू नोंदणीनुसार,  मुस्लिम अशी नोंद असल्याशिवाय मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे ओशिवरा येथील कब्रस्तानात दफन विधी देखील पार पडला असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच, नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखण्यास कोर्टाचा नकार


Nawab Malik : नवाब मलिकांचा 'फोटोबॉम्ब', समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला पोस्ट