एक्स्प्लोर

नवाब मलिकांचा आणखी गौप्यस्फोट, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Nawab Malik : नीरज गुंडे मागच्या सरकारचा दलाल आहे. ज्याच्या घरी देवेंद्र फडणवीस जाऊन बसायचे. आता हा व्यक्ती तासनतास समीर वानखेडे यांच्या कार्यालयात का बसत असतो? याचा आणि क्रूझ पार्टीचा काय संबंध?

Nawab Malik : नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं  होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं. 

याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, नीरज गुंडे हा मोठा चोर आहे. तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होतो, म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंचं सांगणं आहे की, किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट त्या कंपनीमध्ये मोहिज कंबोज याचा मनूभाई आगीचा नावाचा एक नातेवाईक होता. साडे तेरा कोटी रुपये ते त्याने घेतले आहेत. मोहित कंबोज चोर आहे, त्याचा नातेवाईक देखील चोर आहे. आणि खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरमान्य नवाब मलिक यांनी काल जो एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता त्याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून वानखेडे यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी वानखेडे यांनी घटस्फोट दिला. यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार नवाब मलिक यांनी घेतला. दिवाळीनंतर तर भाजपचा भांडाफोड मी करणार आहे. त्यानंतर मात्र भाजपवाले राज्यात कुठेही तोंड दाखवू शकणार नाहीत. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi FDA Action: गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nashik News: पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर
पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget