मुंबई : ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील न्यायालयीन लढाईत आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. वानखेडेंच्या जातीबाबत खुलास करत नवाब मलिकांना नव्यानं एक प्रतिज्ञापत्र कोर्टापुढे सादर करायचं आहे. मात्र हायकोर्टातील याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला असल्यानं आता पुन्हा नव्यानं यात काही दाखल करायचं असल्यास त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्याच परवानगीसाठी गुरूवारी नवाब मलिकांच्यावतीनं कोर्टाकडे विनंती केली जाणार आहे.


एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात नव्यानं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मलिक यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली. त्यावर गुरुवारी दुपारी यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या दालनात सुनावणी पार पडणार आहे.  


 समीर वानखेडे यांच्या शाळेचा प्रवेश अर्ज, शाळा सोडल्याचा दाखल्यावर मुस्लिम असं लिहिलेलं आहे. ती कागदपत्रं मुंबई महापालिकेच्या कार्यालयातून नुकतीच मिळाल्याचा दावा मलिक यांनी यात केलेला आहे. तसेच समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे. सततच्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.


 तर दुसरीकडे, वानखेडे यांनी मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मलिक जाणीवपूर्वक वानखेडे कुटुंबियांवर निराधार आरोप करुन लक्ष्य करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आपले नाव दाऊद नसून आम्ही मुस्लिमही नाही. तर समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट अधिकृतपणे कागदपत्रे मिळवून टाकल्याचा दावा मलिक यांनी हायकोर्टात केला आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर हायकोर्ट काय निकाल देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.


शरद पवारांकडून नवाब मलिकांचे समर्थन;म्हणाले...


.


संबंधित बातम्या :


समीर वानखेडेंसाठी काशिफ खान करतो वसूली; नवाब मलिक यांचा आरोप