तुळजापूर :  दोन वर्षांनंतर यावर्षी  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई  तुळजाभवानी मातेचा (Tulja Bhavani)  शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Mahotsav) उत्साहात पार पडला. निर्बंधमुक्त वातावरणात झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवातील पहिल्या टप्यातील नऊ दिवसात भाविकांनी तुळजाभवानी संस्थानला 3 कोटी 70 लाख 91 हजार 157 रुपये दान दिले आहे.  सोन्याची, चांदीची मोजणी नंतर होणार आहे. 


शारदीय नवरात्र उत्सवातील पहिल्या टप्यातील नऊ दिवसात भाविक विक्रमी संख्येने देवीच्या दर्शनासाठी आले. भाविकांनी तुळजाभवानीचे अभिषेक दर्शन, धर्मदर्शन देणगी दर्शन , मुख दर्शन कळस दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी तुळजाभवानी चरणी  देणगीसह पुजा व अन्य रुपात  तब्बल 3 कोटी 70  लाख 91  हजार 157  रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले. 


कशातून कसे मिळाले उत्पन्न?



  • देणगी दर्शन -  1,67,96,200

  • सिंहासन पेटी - 1,05,37,970

  • दानपेटी-  72,63,030

  • विश्वस्त निधी -18,21,375

  • मनीऑर्डर - 2,46,335

  • नारळ विक्री - 2,44,700

  • धनादेश देणगी - 87,469

  • युपीआय ऑनलाईन देणगी - 51,000

  • नगद - 22,114

  • गोंधळ, लमाण, जावळ - 10,160

  • आराध फी-  4,983

  • पुस्तक विक्री - 1,928

  • कल्लोळ स्वछता - 1050

  • फोटो विक्री - 950

  • प्राणी विक्री - 670

  • भोगी - 650 

  • चरण तिर्थ प्राप्ती - 408 

  •  स्टेट जीएसटी - 59.73

  • सेंट्रल जीएसटी - 59.73


असे एकूण तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञउत्सवात मंदीर समितीला विविध मार्गाने 3 कोटी 70 लाख 91हजार 157रुपये उत्पन्न मिळाले आहे. 


तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. दरवर्षी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे देवीच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोख रक्कम, दागिने असं दान भक्तांकडून देण्यात येतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात भक्तीचा महापूर, 23 लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन


Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय, पुढील वर्षी एक कोटी रुपये देणार