मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election)  शिवसेनेला (Shivsena)  पाठिंबा देण्यावरुन कॉंग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.  कॉंग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही कॉंग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची वोटबॅंक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. 


काँग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.  काँग्रेसनं  स्वबळाचा नारा दिलेला असतांना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न आहे. 


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके  यांच्या  निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे.  या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, स्थानिक काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, मुंबईतील काही काँग्रेस नेते हे वेगळ्या मतप्रवाहाचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत  काँग्रेसच्या जगदिश आमिन कुट्टी या काँग्रेस उमेदवाराला तिस-या  क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती.


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या :


ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणार का? शिंदे गटाऐवजी भाजप मैदानात उतरणार का? अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम


Shivsena : ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर, निकाल तात्काळ लावा; शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी