एक्स्प्लोर

एपीएमसी निवडणुकीचा रणसंग्राम सुरु, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. 27 पैकी 18 संचालकांची मतदानाद्वारे निवड केली जाणार असून त्यामध्ये 12 शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे.

नवी मुंबई : राज्यातील सर्वात मोठी आणि 305 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईच्या कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. 2013 पासून एपीएमसीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात कारभार देण्यात आला होता. याविरोधात कोर्टाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने नवी मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता येत्या 29 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. राज्यातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी मिळून 18 संचालक निवडून येणार आहेत. राज्यभरातील कृर्षी उत्पन्न बाजार समितीतील 12 शेतकरी प्रतिनिधी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पाच व्यापारी आणि एका कामगार प्रतिनिधींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे माजी मंत्री आणि माथाडी कामगार नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांनीही कामगार गटातून संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवणुकीसाठी 75 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 24 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 269 अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 14 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी मतदान चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.

एपीएमसीची वार्षिक उलाढाल ही 10 हजार कोटी रुपयांची असल्याने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना रस असतो. दरम्यान संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर शेतकरी वर्गासाठी निर्णय घेताना अडचणी येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील या दोन नेत्यांचे या संघटनेवर प्राबल्य आहे. राजकीय लपंडावामुळे या दोन नेत्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. संघटनेत दोन गट निर्माण झाले असून संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाटील यांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Embed widget