नवी मुंबई : मुंबईकरांपाठोपाठ सरकारने नवी मुंबईकरांनाही मोठा दिलासा दिला आहे. नवी मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केला आहे.
येत्या काही दिवसात त्यावर अंमलबजावणी होणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नवी मुंबईतील माथाडी, अल्प उत्पन्न घरांत राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात नवी मुंबईतील मेट्रो रेल्वे लाईन सुध्दा सुरू होणार असून याचा पाहणी दौरा आज एकनाथ शिंदे यांनी केला.
तळोजा ते खारघर मार्गावर मेट्रो सुरू होणार असून डिसेंबर 2022 पर्यंत तळोजा ते खारघर मेट्रो धावणार आहे. दरम्यान नवी मुंबईतील सरसकट भूखंड सिडकोला विकता येणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा फायदा कोरोना काळातही लोकांना झाला, घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची माहिती नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट, 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ; राज्य सरकारचा निर्णय
मालमत्ता कर माफीवरुन गोंधळ; भाजप आक्रमक, काँग्रेस नेत्याकडूनही सरकारला घरचा आहेर
Sensex : शेअर मार्केटमध्ये नव्या वर्षाचं स्वागत धमाक्यानं; सेन्सेक्स 929 अंकांनी तर निफ्टी 272 अंकानी वधारला