एक्स्प्लोर
Advertisement
बहिणीच्या हळदीवेळी टोळक्याचा वाद सोडवणाऱ्या तरुणाची हत्या
रोहित वाघ या तरुणाच्या आत्तेबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी त्याच्या दारासमोरच दोन टोळक्यांमध्ये वाद सुरु झाला. भांडण सोडवण्यासाठी रोहित मध्ये पडला आणि तिथेच त्याचा घात झाला.
नाशिक : घरासमोरील भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच प्राण गमवावे लागले. नाशकात बहिणीच्या हळदीवेळी घरासमोर झालेल्या टोळक्याच्या वादात पडलेल्या तरुणाचीच हत्या करण्यात आली.
रोहित वाघ या तरुणाच्या आत्तेबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी त्याच्या दारासमोरच दोन टोळक्यांमध्ये वाद सुरु झाला. भांडण सोडवण्यासाठी रोहित मध्ये पडला आणि तिथेच त्याचा घात झाला.
टोळक्यातल्या 15 ते 20 जणांनी धारदार शस्त्राने रोहितवरच वार केले. यामध्ये रोहितचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे लग्न समारंभाच्या तोंडावरच वाघ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नाशिकच्या उपनगर पोलिस हद्दीत काल रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement