एक्स्प्लोर

मुलीच्या कुटुंबीयांमुळेच कौमार्य चाचणी, पतीचा दावा

नाशिक: संगमनेरमधील कौमार्य तपासणी प्रकरणाला नवं मिळालं आहे. कारण मुलीच्या कुटुंबीयांनीच जबरदस्तीने कौमार्याची परीक्षा देण्यासाठी भाग पाडलं, असा दावा पीडित तरुणीच्या पतीनं केला आहे.   मुलीच्या कुटुंबीयांनीच मला जबरदस्ती कौमार्याची परीक्षा घ्यायला सांगितली आणि पंचांचं नाव सांगितलंय. याप्रकरणाचा आणि पंचांचा काहीही संबंध नाही, असा दावाही त्यानं केला आहे. एवढंच नाही तर मुलींच्या कुटुंबीयांना हे लग्न नको आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. आतापर्यंत मी त्यांना 71 हजार रुपये दिल्याचंही मुलांनी सांगितलं.   याशिवाय मुलीचा सांभाळ करायची तयारीही असल्याचा दावाही त्यानं केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.   काय आहे प्रकरण?   लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडली. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्याचा आरोप करत, नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला. २२ मे रोजी हा विवाह झाला होता.   जातपंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारिरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही. म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंच मोकळे झाले.   पुढे बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.   चांदगुडे यांच्या माहितीनुसार पीडित तरुणीचे पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती..मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी मार्गानं कौमार्याचा निर्वाळा लावणाऱ्या जातपंचाना गृहखातं बेड्या कधी ठोकतं..हे पाहणं महत्वाचं आहे. संबंधित बातम्या

नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं

कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

Embed widget