एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड
नाशिक : लग्नासारखे सोहळे सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राजेंद्र जाधवला नाशकातील म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
1 मार्च 2017 रोजी नाशिकमधील मेरी रोडवर असलेल्या औदुंबर लॉन्समध्ये विवाहसोहळा होता. लग्नाच्या दिवशी वधूच्या बॅगमधून 1 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता
औदुंबर लॉन्स मधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु असताना भद्रकाली परिसरातून राजेंद्र जाधवला पोलिसांनी केली अटक केली. आरोपीने 2014 साली अशाच प्रकारे पंचवटी परिसरात चोरी केल्याचीही माहिती आहे.
नागपुरात लग्नघराचा बँड वाजवणारी बबली गजाआड
काहीच दिवसांपूर्वी नागपुरातून विमल इंगळेला पोलिसांनी अटक केली होती. लग्नघरांचा बँड वाजवणाऱ्या विमलच्या घरातून अक्षरशः कुबेराचा खजिना सापडला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement