एक्स्प्लोर

नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार: सूत्र

मुंबई: मुंबईसह दहा महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्वबळावर लढावं असा सूर 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत निघाला. आज मातोश्रीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, खासदार आणि आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये युती न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला खासदार शिवाजी आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपस्थित होते. पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड येथील युतीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. पण तेथील स्थानिक आमदार आणि खासदारांनी युतीविरोधात आपलं मत मांडलं. भाजपमध्ये बाहेरुन लोकं घेतली जात आहेत. त्यामुळे या लोकांसाठी युतीच्या चर्चेत भाजप जागांबाबत अवास्तव मागणी करत आहेत. याचा फटका शिवसेनेलाही बसू शकतो. असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सगळ्या जागांची यादीही उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. भाजप युतीच्या प्रतीक्षेत शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी कॅम्पेनिंग सुरु केले असताना भाजपमध्ये काहीही हालचाली दिसत नाहीत. शिवसेनेसोबत युती होईल, या प्रतीक्षेत भाजप आहे. म्हणूनच भाजपचा जाहीरनामाही रखडला आहे.  शिवसेनेची तयारी शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी ‘वचननामा’ प्रसिद्ध करत भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. एवढंच नव्हे, तर मुंबईतल 227 जागांसाठी उमेदवार यादीही अंतिम करण्यात आली आहे. शिवाय, 26 तारखेला उद्धव ठाकरेंची सभाही होणार आहे. भाजपची तयारी कुठवर? भाजपने मुंबई महापालिकेसाठी अद्याप 227 उमेदवारांची यादीही अंतिम केली नाही. मात्र, काल रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची दोन तासांहून आधिक वेळ भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. संबंधित बातम्या: शिवसेनेची तयारी जोरात, भाजपची फरफट सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget