Nashik BJP : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक (Nashik) भाजपच्या शहराध्यक्ष पदाचा तिढा अखेर सुटला असून नाशिक शहराध्यक्षपदी (Nashik BJP) माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव व शंकर वाघ यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलावरून हालचालींना वेग आला होता. त्यातच दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी नाशिकमध्ये (Nashik) येऊन पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. त्यानुसार अखेर जाधव आणि बच्छाव यांची अनुक्रमे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद ,लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांना संघटनात्मकदृष्ट्या मोठे काम करावे लागणार आहे. जाधव हे 6 वर्ष शहर संघटक सरचिटणीस तर बच्छाव हे 2  वर्ष जिल्हा सरचिटणीस होते. तसेच यापूर्वीही  त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे. पालवे यांनी 4 वर्षाच्या कार्यकाळात अनेक संघटनात्मक कार्य केले. तसेच गत विधानसभा निवडणुकीत नाशिकचे तिन्ही आमदार निवडून येण्यामध्ये पालवे यांची भूमिका महत्वाची ठरली होती.


भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी प्रशांत गोरख जाधव (Prashant Jadhav) यांची नियुक्ती झाली आहे. ते गिरीश पालवे (Girish Palve) याची जागा घेतील. प्रशांत जाधव हे शांत व हसतमुख व्यक्तिमत्त्व आहे. एक लहान कार्यकर्ता ते शहराध्यक्ष हा त्यांचा प्रवास वाखाण्याजोगा आहे. येवला (Yeola) तालुक्यातील अंदरसुल येथील असलेले जाधव यांचे शिक्षण भाऊसाहेबनगर येथे झाले. बॉश कंपनीतून त्यांनी नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. या आधी दोन टर्म संघटन सचिव म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांची ही निवड झाल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. प्रशांत जाधव यांच्यावर अभिनंदनाचा एकच वर्षाव होत आहे. त्यानुसार आता गेल्या वर्षभरापासून नाशिक शहराध्यक्षपदासह जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे...


भाजपकडून संघटनात्मक बदल 


दरम्यान, याअगोदर भाजपच्या शहराध्यक्षपदी गिरीश पालवे हे कामकाज बघत होते. 2019 च्या निवडणुकीवेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप  यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच त्यांचे शहराध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले होते. त्यावेळी गिरीश पालवे यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर पालवे यांना दोन वेळेस मुदतवाढ मिळाली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा बदल केला असून राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून राज्यातील एकुण 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Politics : नाशिकचं राजकारण बदललं, भाजपचं मंत्रीपद पाण्यात तर सुहास कांदेही अडचणीत?